सरळ सेवा भरती म्हणजे काय? सरळ सेवेमध्ये कोणती पदे भरली जातात? सरळ सेवा भरती सर्व माहिती - Maha Exam Point
सरळ सेवा भरती म्हणजे काय? सरळ सेवेमध्ये कोणती पदे भरली जातात? सरळ सेवा भरती म्हणजे काय व सरळ सेवेमार्फत कोणकोणती पदे भरली जातात व त्यामध्ये त्यांना पगार किंती दिलो जातो या असा अनेक तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. MPSC भरतीचे प्रकार :- आयोगा मार्फत एकूण चार प्रकारात भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यात एक म्हणजे सरळ सेवा भरती,दुसरा प्रकार पदोन्नती, तिसरा प्रतिनियुक्ती व चौथा म्हणजे बढतीसह प्रतिनियुक्ती या प्रकारे आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबविली जाते. यात सरळ सेवा भरती ही सरळसेवा परिक्षा किंवा स्पर्धा परीक्षा या दोन मार्गाने भरती प्रक्रिया केली जाते.साधारण पणे वर्ग काही 2 व वर्ग 3 ची पद सरळसेवा मार्फत भरली जातात. तर वर्ग 1 ची पदे स्पर्धा परीक्षे मार्फत भरली जातात. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अल्पावधीतच (कमीच वेळेत) सरळसेवा परीक्षा घेतली जाते...