पोलिस उपनिरीक्षक (PSI) पद संपुर्ण माहिती व तयारी कशी करायची?PSI Exam All Information in Marathi
पोलिस उपनिरीक्षक (PSI) पद संपुर्ण माहिती व तयारी कशी करायची? PSI Exam All Information in Marathi पोलिस उपनिरीक्षक (PSI) या पदाची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पूर्ण केली जाते. ही भरती प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबवली जाते. पोलिस उपनिरीक्षक या भरती प्रक्रियेचा अभ्यासक्रम इतर एमपीएससी च्या परीक्षेच्या सारखाच आहे. पात्रता : ( i) पदवीधर असणे आवश्यक आहे. ( ii ) तसेच मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. वय :- खुला गट - 19 ते 28 वर्ष, राखीव गट - 19 ते 31 वर्ष. उंची :- पुरुषांसाठी - 156 सेमी, छाती - 79 सेमी महिलांसाठी - 157 सेमी परीक्षेचे टप्पे :- एकूण 3 टप्पे असतात. • पूर्व परीक्षा - 100 गुण • मुख्य परिक्षा - 200 गुण • मुलाखत - 75 गुण • पोलिस उपनिरीक्षकसाठी 200 गुणांची शारीरिक चाचणी देखील घेतली जाते. पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा (PSI Preliminary Exam) : ...