पोलिस उपनिरीक्षक (PSI) पद संपुर्ण माहिती व तयारी कशी करायची?PSI Exam All Information in Marathi

पोलिस उपनिरीक्षक (PSI) पद संपुर्ण माहिती व तयारी कशी करायची? PSI Exam All Information in Marathi



पोलिस उपनिरीक्षक (PSI) या पदाची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पूर्ण केली जाते. ही भरती प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबवली जाते. पोलिस उपनिरीक्षक या भरती प्रक्रियेचा अभ्यासक्रम इतर एमपीएससी च्या परीक्षेच्या सारखाच आहे.


पात्रता : 

( i)  पदवीधर असणे आवश्यक आहे. 

( ii ) तसेच मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे.  

 

वय :- खुला गट - 19 ते 28 वर्ष, राखीव गट - 19 ते 31 वर्ष.  

 

उंची :- 

पुरुषांसाठी  - 156 सेमी, छाती - 79 सेमी          

महिलांसाठी - 157 सेमी    

 

 

परीक्षेचे टप्पे :- एकूण 3 टप्पे असतात.

• पूर्व परीक्षा -  100 गुण 

• मुख्य परिक्षा - 200 गुण 

• मुलाखत -     75 गुण

 

• पोलिस उपनिरीक्षकसाठी 200 गुणांची शारीरिक चाचणी देखील घेतली जाते.


पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा (PSI Preliminary Exam) : 

 

 *पेपर  1 - 100 गुण  वेळ - 1 तास  

यात चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, भारतीय राज्यघटना, जनरल सायन्स ई. समावेश असतो.


पोलिस उपनिरीक्षक मुख्य परिक्षा (PSI Mains Exam) :

 पेपर 1 - 100 गुण    

• मराठी -  60 गुण   

• इंग्रजी - 40 गुण  

 

पेपर 2 - 100 गुण


यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, माहितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम -2005, संगणक व माहिती तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा ( शासनाची रचना अधिकार व कार्य) केंद्रसरकार केंद्रीय विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन ( महाराष्ट्राचा विषेश संधर्भ), जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व न्यायमंडळ इ. घटकांचा समावेश असतो.

 

पोलिस उपनिरीक्षक पुरुष शारिरीक चाचणी (PSI physical test) :

 

पोलिस उपनिरीक्षक पुरुष शारिरीक चाचणी एकूण गुण -200   

• थाळीफेक  (वजन 7.26 किलोग्रम, अंतर 7.5 मीटर) - 40 गुण 

• पुल-अप्स  -  40 गुण 

• लांब उडी ( 4.5 मीटर) - 20 

• धावणे ( 800 मी ) 2 मी 30 सेकंद - 100


पोलिस उपनिरीक्षक महिला शारीरिक चाचणी (PSI Female Physical Test ) :

 

एकूण गुण - 200  

• थाळी फेक  (वजन 4.5 किलोग्रम अंतर 6 मीटर )   - 40

 • चालणे  ( 3 किमी - 23 मी )  - 80 

• धावणे ( 200 मी )  37 सेकंद - 80


अशा प्रकारे पोलिस उपनिरीक्षक पद भरती राबवली जाते.


हे पण वाचा....


एमपीएससी ( MPSC) संपुर्ण सविस्तर माहिती

Comments

Popular posts from this blog

HOW TO UPDATE MPSC USER PROFILE PAGE PROCESS || MPSC PROFILE UPDATION 2021

NHM ठाणे भरती 2021 थेट मुलाखत