How To Crack MPSC Exam In First Attempt? MPSC Crack Study Strategy Plan

How To Crack MPSC Exam In First Attempt? MPSC Crack Study Strategy Plan

 

 

एमपीएससी (MPSC) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे उत्तीर्ण करायची असेल तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांकडे परीक्षे बाबतची सर्व माहिती असणे गरजेचे असते. तसेच परिक्षा ही कोणत्या स्वरूपाची व मागील वर्षी झालेले सर्व पुर्व पेपर अनुभवणे गरजेचे असते. तसेच एमपीएससी (MPSC) सारखी परिक्षा पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करायची असेल तर अभ्यासाचे नियोजन करता येणे आवश्यक असते. कारण जर विद्यार्थी योग्य अभ्यासाचे नियोजन करता आले तर ही परिक्षा पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करता येईल.

 


 

• पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी (MPSC) परिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खालील बाबींचा उपयोग करणे गरजेचे आहे.


1) परिक्षचे आकलन

2) अभ्यासाचे नियोजन

3) मागील वर्षीचे पेपर सोडवणे

4) अभ्यासक्रम व स्वतचा वेळापत्रक.

5) दरोराजचा सराव

6) महत्वाच्या घटनांची नोंद

वरील सर्व बाबींचा समावेश आपल्या दररोजच्या जीवन शैलीत असणे गरजेचे आहे.

 

वरील बाबींचा समावेश का करायला पाहिजे?


जर तुम्ही एमपीएससी (mpsc) या परीक्षेचे योग्य आकलन कराल तर तुम्हाला परिक्षेचे स्वरूप व परिक्षा ही कोणत्या प्रकारची असते. परीक्षांचा अभ्यासक्रम समजून घेण्यात मदत होईल. जर तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण पणे अनुभवला असेल तर कोणता विषय महत्त्वाचा आहे व परीक्षांच्या दृष्टीकोनातून तुम्ही विचार करू शकाल तसेच तुम्ही तुमच्या क्षमते नुसार अभ्यासचे नियोजन करू शकाल. अभ्यासचे नियोजन पद्धत जर तुम्हाला करता आली तर ही परिक्षा यशस्वी पणे उत्तीर्ण होऊ शकता. तसेच ही परिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मागिल वर्षीचे प्रश्न सोडवणे व त्यांचा नियमित सराव करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही मागिल वर्षीचे प्रश्न पत्रिका नियमित पणे सोडवत असाल तर तुम्हाला तुमचा भविष्यात होणाऱ्या परीक्षेत कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात याचा अंदाज तुम्हाला लावता येईल. जर तुम्ही अभ्यासक्रमाच्या नियोजन योग्य पद्धतीने केलात तर स्वतःचा वेळापत्रक योग्य पद्धतीने तयार करणे आवश्यक असते. कारण तुमचं नियोजन हे तुम्हाला परीक्षेत उपयोगात पडेल योग्य पद्धतीने जर प्रश्न सोडवलात तर तुम्ही चांगले गुण परीक्षेत मिळवू शकता. नियमित सरावाने तुम्ही तुमची आकलन क्षमता वाढू शकता.


MPSC Subject & Covering Question 

 

एमपीएससी (MPSC) च्या परीक्षेत प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यासक्रम असणे गरजेचे असते. आता पर्यंत विचारली गेलेली प्रत्येक विषयातील प्रश्न व प्रश्न संख्या.

 

 

1) इतिहास :

इतिहास या विषयातील 3 ही भाग महत्त्वाचे आहेत. एमपीएससी (MPSC) दर वर्षी आपल्या परीक्षेत 7 व 8 प्रश्न विचारले जातात.प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासातील प्रश्न आढावा घेण्यासारखे विचारली जातात.


आधुनिक इतिहास हा एमपीएससी (MPSC) साठी खूप महत्त्वाचा इतिहास असून यातील बहुतांशी प्रश्न परीक्षेत विचारली जातात. तसचे आधुनिक इतिहासातील प्रत्येक घटनेचा अभ्यास ठेवणे गरजेचे असते. आधुनिक इतिहासाचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी तुम्ही 11 वी इतिहास (महाराष्ट्र राज्य बोर्ड) चे पुस्तक वापरू शकता.


2) भूगोल :

एमपीएससी (MPSC) आपल्या परीक्षेत नकाशे व दर्या यावरील प्रश्न दरवर्षी टाकत असते. त्यामुळं आपल्याला नकाशे व दर्या नद्या तलाव व धरणे या सर्व गोष्टींचा अभ्यास ठेवणे आवश्यक आहे. भूगोल या विषयासाठी 11 वी व 12 वी (महाराष्ट्र राज्य बोर्ड) ची पुस्तक उपयोगी येणारी आहेत.


3) सामान्य विज्ञान :

एमपीएससी (mpsc) दरवर्षी सामान्य विज्ञान या विभागातून 15 ते 20 प्रश्न विचारली जातात. त्यात 11 वी व 12 वी (महाराष्ट्र राज्य बोर्ड) सामान्य विज्ञान पुस्तकातून 9 ते 10 प्रश्न विचारली जातात.


4) अर्थशास्त्र :

एमपीएससी (MPSC) च्या परिक्षेत अर्थशास्त्र हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण या विषयातून विचारली जाणारी बहुतांशी प्रश्न ही चालू अर्थशास्त्रीय घटनांवरून विचारली जातात. त्यामुळं अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करते वेळेस सर्व अर्थशास्त्रीय घटनचा अभ्यासणे आवश्यक असते.



5) चालू घडामोडी : 

चालू घडामोडी हा विषयाचा घटक सर्वच परीक्षांना करीता महत्त्वाचा आहे. परंतु एमपीएससी (MPSC) च्या दृष्टीकोनातून चालू घडामोडी या घटकातील दरवर्षी 5 ते 8 प्रश्न विचारली जातात व त्यात राष्ट्रिय व राज्यांतील सर्व महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास ठेवणे आवश्यक असते.



6) राज्यशास्त्र (Polity) : 

एमपीएससी (mpsc) राज्यशास्त्र या विषयाकरिता M. Laxmikant (के सागर पब्लिकेशन) ही पुस्तकं अति उत्तम आहे.


हे पण वाचा

 

सरळ सेवा भरती म्हणजे काय सविस्तर माहिती वाचा.

 

एमपीएससी ची तयारी कशी सुरु करायची?

 

एमपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात कशी पास करायची?

Comments

Popular posts from this blog

HOW TO UPDATE MPSC USER PROFILE PAGE PROCESS || MPSC PROFILE UPDATION 2021

NHM ठाणे भरती 2021 थेट मुलाखत