एमपीएससी (MPSC) संपुर्ण सविस्तर माहिती मराठीमध्ये || MPSC All Information in Marathi

एमपीएससी (MPSC) संपुर्ण सविस्तर माहिती मराठीमध्ये || MPSC All Information in Marathi 

 


 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा महाराष्ट्रातील विविध विभागातील सनदी व बिगर सनदी अधिकाऱ्यांच्या भरती करीत असतो. विविध परिक्षा पैकीं दोन प्रकारच्या परिक्षा सर्व सामान्य पदवीधरांसाठी जास्त उपयुक्त असतात. एमपीएससी (MPSC) मार्फत पुढील पदे भरली जातात.

 

• राज्यसेवा परीक्षा  

• पोलिस उपनिरीक्षक/सहाय्यक/विक्रीकर निरीक्षक  

• टंकलेखन/लिपिक परीक्षा

 

राज्यसेवा परीक्षा  

 

राज्य शासनातील गट 'अ' व 'ब' संवर्गातील पद भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. ती पूर्व परीक्षा, मुख्य परिक्षा व मुखलात अशा तीन टप्प्यात घेतली जाते.

 

 

वय

खुला गट - 19 ते 33 वर्ष          

राखीव गट - 19 ते 38 वर्ष 

 

राज्यसेवा परीक्षेमार्फत भरली जाणारी पदे... 

 

गट 'अ'  

 

• Deputy Collector 

 Deputy Superintendent of Police (DySP) 

 Assistant Commissioner of Police (ACP) 

 Sub-registrar Cooperative Societies 

 Deputy Chief Executive Officer 

 Block Development Officer (BDO) 

 Tahsildar 

 Desk Officer 

 Assistant Regional Transport Officer (ARTO) 

 M.F.A.S (Maharashtra Finance & Account Service) 

 Chief Officer (Nagarpalika) ( I & II) 

• Assistant Commissioner of Sales Tax 

 Mantralaya Section Officer

 

 गट 'ब'  

 

• Taluka Inspector of Land Records (TILR) 

 Naib Tahsildar

 

 

एमपीएससी (MPSC) पूर्व परीक्षा माहिती

 

एमपीएससी (MPSC) पूर्व परीक्षा ही एकूण 400 गुणांची असून प्रत्येकी दोन पेपर असतात.नव्या अभ्यास पद्धतीनुसार पूर्व परीक्षेसाठी प्रत्येकी 200 गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतात. या साठी दोन तासांच्या वेळ असेल.प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून (Multiple Choice Question) प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी या दोन भाषेत असेल. पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रम केंद्रीय आयोगाच्या नागरी सेवा परीक्षे प्रमाणेच आहे. 

 

एमपीएससी (MPSC) मुख्य परिक्षा माहिती.....

 

एमपीएससी (MPSC) मुख्य परिक्षा ही एकूण 800 गुणांची असून 6 पेपर असतात. तसेच यात 2 पेपर भाषा विषयाच्या ( मराठी + इंग्लिश) असतात.  

 

भाषा विषय पेपर मार्कस :

1)  पेपर 1 - मराठी - गुण 100 - वेळ - तीन तास 

2)  पेपर 2 - इंग्लिश - गुण 100 - वेळ - तीन तास 

 

 
दोन्हीं पेपर हे दीर्घउत्तरी स्वरूपाचे असतील. भाषा अभ्यासक्रमात निबंध लेखन, पत्र व्यवहार, अहवाल लेखन, पत्रकार परिषद, औपचारिक भाषण तयार करणं, संवाद कौशल्य, उताऱ्यावरील प्रश्न भाषांतर, सारांश लेखन व व्याकरण इ. चा समावेश असेल.

चार पेपर हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. या अभ्यासक्रमाची पातळी पदवी स्थराची असते.3:1 या प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग ( नकारात्मक गुण) पद्धत असेल.(चुकीच्या 3 उत्तरांसाठी 1 गुण कमी केला जाईल) प्रत्येकी पेपर 150 गुणांचा असेल व वेळ दोन तास असतील. 


पेपर व विषय सूची :


1) पेपर 1 ------- History & Geography 

2) पेपर 2 ------- Indian Constitution & Indian Politics (with ref.to Maharashtra) & Law 

3) पेपर 3 ------- Human Resource Development (HRD) & Human Rights 

4) पेपर 4 ------- Economic of Planning & Development Science & Technology Development.

 

प्रत्येकी पेपर मध्ये खुला गटातील उमेदवारांनी 45% गुण व राखीव वर्गातील उमेदवारांनी 40% गुण मिळवणं आवश्यक आहे.

 

MPSC FAQs  

 

1) MPSC चे संपुर्ण रूप काय आहे? 

उत्तरं : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission ) हे पूर्ण रूप आहे.  

 

2) एमपीएससी (MPSC) भरती प्रक्रिया किती वर्षाने राबविली जाते? 

उत्तर : एमपीएससी (MPSC) मार्फत प्रत्येक वर्षी MPSC मधील वेगवेगळ्या रिक्त पदांकरीता भरती प्रक्रिया राबवली जाते.  

 

3) एमपीएससी (MPSC) परिक्षा पहिल्या प्रयत्नांत पूर्ण करू शकतो का?

उत्तरं: होय. कारण खूप विद्यार्थ्यानी MPSC परिक्षा पहिल्या प्रयत्नांत पूर्ण करुन अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केले आहेत.  

 

4) एमपीएससी (MPSC) परिक्षा खुप अवघड असते का?

उत्तर: नाही. कारण ज्या विद्यार्थ्यानी ही परीक्षा उत्तीर्ण केले आहेत त्यांच्या मतानुसार जर अभ्यास पूर्ण असेल तर ही परिक्षा सोपी असते.  

 

5) एमपीएससी (MPSC) साठी कोचिंग क्लासेस लावणे गरजेचे असते का? 

उत्तर: नाही. जर तुम्हाला कोचिंग क्लासेस चा खर्च परवडत नसेल तर तुम्ही स्वतः अभ्यासकरून (Self Study) करून उत्तीर्ण होऊ शकता.  

 

6) एमपीएससी (MPSC) व युपीएससी (UPSC) मध्ये काय फरक आहे? 

उत्तर : एमपीएससी (MPSC) ही महाराष्ट्र राज्य पूर्ती मर्यादित शासकीय नोकर भरती आहे. तर UPSC ही केंद्रा मार्फत घेतली जाणारी भरती प्रक्रिया असून या पदावरील अधिकारी संपुर्ण भारतात कुटे ही काम करू शकतात.

 

 

हे पण वाचा....  

 

पोलिस उपनिरीक्षक (PSI) पद संपुर्ण माहिती व तयारी कशी करायची?

Comments

Popular posts from this blog

HOW TO UPDATE MPSC USER PROFILE PAGE PROCESS || MPSC PROFILE UPDATION 2021

NHM ठाणे भरती 2021 थेट मुलाखत